गावाविषयी माहिती
बोटोशी,
बोटोशी हे गाव देवबांध पिंजाळ नदीच्या तिरावर वसलेले आहे बोटोशी गावाला वळसा देऊन जानारी पिंजाळ नदी गावाच्या पुर्वेला गावा देवीच मंदीरा जवळ मोठे वेहळ्याचे झाड आहे.आंब्याचे झाड आहे गावाच्या मध्ये भागी मारुतीचे मंदिर आहेगावाच्या चारी बाजुन नदी आणि डोंगर आहेत डोंगरावर मोठी झाडी आहे गावाच्या पश्चिम दिशेला मर्कटवाडी हा एक पाडा आहे हा पाडा डोंगरावर असुन तिथुन पिंजाळ नदी कुर्लोद कडे जाते. बोटोशीच्या पुर्वेला बेलपाडा आहे बेलपाडा येथे शाळा आहे इ १ ली ते ५ वी पर्यत शाळा आहे गावात आंब्याची झाडे आहेत चिंचेची झाडे आहेत बेलपाड्याच्या उत्तरेला भोसपाडा आहे हे एकदम डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. गावाच्या पश्चिमेला घातोडीचा ओहळ आहे पुर्वेला व दक्षिणेला मोठे डोंगर आणि झाडी आहे.पाथर्डी,
पाथर्डी गाव हे गोमघर आंब्याची विहिर डोंगरवाडी कडुन येणारा मोठा ओहळ आहे आणि त्या ओहळाच्या तिरावर पाथर्डी हे छोटेशे गाव वसलेले आहे. मोखाडा तालुका आणि पालघर जिल्यातील असुन पाथर्डी गाव हे मुळ गावठण असुन त्यांना जोडुन चार पाडे आहेत. डोंगरवाडी,धिंडेवाडी, रामवाडी पाटीलपाडा हे चार पाडे आहेत पाथर्डी गावठाणच्या पुर्वेला एक मोठा ओहळ आहे. गावाच्या उत्तर दिशेला गावदेवी मंदिर आहे गावाच्या पच्छिम दिशेला डोंगर आहेत व दक्षिण दिशेला मोठे डोंगर आहेत पाथर्डी गाव पैकी धिंडेवाडी मध्ये बहिरोबाचे मंदिर आहे मंदिरा जवळ मोठी झाडे आहेत वेहळ,आंबा,सफेद चाफा आशी झाडे आहेत आमच्या पाथर्डी गाव पैकी रामवाडी हि ओहळाच्या तिरावर वसलेली आहे तिथे गावाच्या पुर्वेला ओहळ आहे पच्छिमेला मोठे डोंगर व मोठी झाडी आहे गावाच्या उत्तर दिशेला पाटीलपाडा वसलेला आहे पाटीलपाडा हा पाडा देवबांध पिंजाळ नदीच्या तिरावर वसलेले आहे गावात गावात मोठी चिंचेची झाडे आहेत आंब्याचा झाड आहे आणि प्रत्येक पाड्या मध्ये जि.प.शाळा आहे. त्यात पाटीलपाडा येथे केंद्र शाळा इयत्ता १ली ते ८वी पर्यत आहे.